
Ro-Ro Ferry service
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईच्या पारंपरिक फेरी बोटी आता डिजिटल युगात पाऊल ठेवत आहेत. भाऊचा धक्का ते रेवस, उरण, मोरा, तसेच गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा, अलिबाग या मार्गांवरील प्रवास आता अधिक सोयीस्कर, पारदर्शक व सुरक्षित होणार आहे. ई-तिकीट खरेदी प्रणालीसह बोटीची रियल टाइम माहिती प्रवाशांना लवकरच उपलब्ध होणार आहे. सागरी महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली.