Mumbai : आत्ताच ही परिस्थिती, पावसाळ्यात काय ?

काटई नाका, कोळेगाव रोडवर पावसाचे पाणी साचल्याने
Mumbai
MumbaiSakal
Updated on

डोंबिवली - मंगळवारी सकाळी अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने कल्याण शीळ रोडवरील काटई नाका येथील रस्त्याची दुरावस्था झाली. खड्डे आणि त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागला. तर कोळेगाव येथे रस्त्याचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु असून या ठिकाणी देखील पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले.

रस्त्यांची सीमेंट कॉंक्रीटीकरणची कामे अर्धवट अवस्थेत असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होतील याची शाश्वती नाही. अवघ्या काही मिनीटांच्या पावसाने रस्त्यांची हि अवस्था करुन ठेवल्याने पावसाळ्यात काय परिस्थिती समोर उद्भवेल या विचारानेच वाहनचालक चिंतेत पडले आहेत.

मंगळवारी सकाळी कल्याण डोंबिवली सह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनिटे पडलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळाले.

कल्याण शीळ रोडवरील काटई नाका हा कोंडीचे ठिकाण असलेला एक टप्पा आहे. कल्याण, डोंबिवली मार्गे मुंबई, नवी मुंबई कडे जाणारी वाहने तसेच अंबरनाथ, बदलापूर, खोणी मार्गे मुंबई दिशेकडे जाणारी वाहने काटई नाका येथे एकत्र येतात. या नाक्यावरुन वळण घेऊन मुंबई दिशेला वाहने प्रवास करतात.

Mumbai
Sharad Pawar : सुप्रिया सुळेंप्रमाणेच उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाच्या घोषणेवेळी रंगलं होतं राजकारण !

तीन रस्ते एकत्र येत असल्याने या ठिकाणी वाहनांची कोंडी होते. पावसाळ्यात या नाक्यावरील रस्त्याची दुरावस्था झाल्याने खड्डे पडून वाहनचालकांना खराब रस्त्याबरोबरच वाहन कोंडीचा सामना करावा लागला होता. कल्याण शीळ रोड तसेच बदलापूर कडे जाणाऱ्या मार्गाचे सीमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहे.

चौकातील खड्ड्यांवर उतारा म्हणून या भागातील सिमेंट कॉंक्रीटीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यातील बहुतांश काम अद्याप शिल्लक आहे. पलावा मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. यामुळे काही काळ वाहनचालकांना दिसाला मिळाला असला तरी अवकाळी पावसाने पुन्हा या रस्त्यावर पाणी फेरले आहे.

Mumbai
Sharad Pawar : 'पवार साहेब तुम्ही आम्हाला हवे आहात!' कार्यकर्त्यांना रडू कोसळले

मंगळवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्यावरील खड्ड्यांतील खडी उखडून जाऊन त्यात पाणी साचले आहे. या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. यामुळे येथे वाहन कोंडी होत होती. काटई नाका प्रमाणेच कोळेगाव रस्त्यावर देखील पाणी साचल्याचे दिसून आले. कोळेगाव ते काटई नाका रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरणचे काम सुरु आहे.

रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरु असून दुसऱ्या बाजूला कच्च्या रस्त्यावर पाणी साचून चिखल झाला होता. या चिखलातून मार्ग काढताना वाहनचालकांना सांभाळून प्रवास करावा लागत होता. चढउतार झाल्याने वाहने अगदी एका साईडला कलंडली असल्याचे दिसून येत होते. सकाळी अवघे दहा ते पंधरा मिनिटे पडलेल्या पावसात कल्याण शीळ रोडची अशी अवस्था झाल्याने पावसाळ्यात येथे काय चित्र असेल या विचारानेच वाहनचालकांच्या पोटात गोळा येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com