Mumbai News: रस्ते दुरुस्तीला पूर्णविराम नाहीच! जून उजाडला तरीही पालिकेची कामे जैसे थे, मुंबईकर हैराण
Road Construction: मुंबई व उपनगरांत सध्या रस्त्यांची कामे सुरु आहेत. पावसाळाआधीच कामे पूर्ण करणे निश्चित असते. मात्र जून महिन्याला सुरुवात झाली तरीही पालिकेची रस्ते दुरुस्तीची कामे सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती कामे सुरु आहेत. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर आदी ठिकाणी रस्ते दुरुस्ती कामे सुरु आहेत. परिणामी त्यामुळे काही रस्ते बंद आहेत. या रस्ते दुरुस्ती कामांनामुळे मुंबईकरांची कोंडी होत आहे.