
मुंबई : मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते, मुंबईत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानाकडे निघाले आहेत. मुंबई पोलिसांनी काही अटींसह फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने मोर्चामधील लोक हे पायी, मोटर सायकल, मोटर कार/टेम्पो/ट्रक इत्यादी वाहनांनी येणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.