esakal | Mumbai: सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडून नामंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझे

मुंबई : सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडून नामंजूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एंटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने आज नामंजूर केला. वाझेवर नुकतीच खासगी रुग्णालयात हदयशस्रक्रिया झाली आहे. यामुळे पुढील उपचार आणि देखभालीसाठी घरी नजरकैदेत राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारा अर्ज वाझेने केला होता. यावर विशेष न्या ए टी वानखेडे यांच्या पुढे सुनावणी झाली. एनआयएच्या वतीने या अर्जाला विरोध करण्यात आला. वाझे वर सरकारी रुग्णालयात आणि कारागृहात योग्य ते उपचार केले जाऊ शकतात. तसेच त्याची देखभालही घेतली जाईल, असे एनआयएकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: बलात्कार प्रकरण : 21 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

न्यायालयाने दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि घरामध्ये नजरकैदेत ठेवण्याची मागणी अमान्य केली. वाझेला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात यावे आणि आवश्यकता वाटल्यास जे जे शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. तसेच घरचे जेवण देण्याची वाझेची मागणी न्यायालयाने मान्य केली. एटीलिया स्फोटक आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात वाझेसह अन्य दोन पोलीस कर्मचारी अटकेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. वाझेवर वोक्हार्ट रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे.

loading image
go to top