

Mumbai Manhole Tragedy: Person Dies After Falling Into Open Drain
esakal
Mumbai Manhole Tragedy: मुंबईतील साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मुंबई महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघडा मॅनहोल, त्यावर संरक्षक जाळी नसणे आणि प्रशासनाला याची माहिती नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.