
मुंबई : देशभरात ड्रग्जविरुद्ध पोलिसांची कारवाई सुरूच असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी याप्रकरणी मोठी कामगिरी केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्ब्ल ४०० कोटी रुपयांच्या MD ड्रग्जवर कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी कर्नाटकातील म्हैसूरमध्येही ड्रग्ज प्रकरणात छापे टाकले आहेत.