

mumbai fire
esakal
मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात मंगळवारी सायंकाळी भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण भाजल्याने जखमी झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.