Mumbai : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा 2023 अखेर खुला होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समृद्धी महामार्गा

Mumbai : समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा 2023 अखेर खुला होणार

मुंबई : नागपुर - मुंबई जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा पहिल्या टप्याचे 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला, नागपुर - शिर्डी या 520 किलोमीटरचा प्रवास सध्या नागरिकांना करता येत असून, नविन वर्षांच्या अखेर शिर्डी - मुंबई या दुसऱ्या टप्यातील समृद्धी महामार्गाचे काम पुर्ण करण्यात येणार असून, काम वेगाने सुरू असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या महामार्गाने 390 खेड्यांमधून मार्ग काढला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्हे ओलांडले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. वेगवान प्रवासासाठी या महामार्गाची ओळख असून, नागपुर ते मुंबई पोहचण्यासाठी प्रवासाच्या वेळेत आठ तासांची बचत होणार असून, सध्या स्थितीत नागपुर - मुंबई प्रवासाला 16 तास लागते आहे.

त्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी ताशी 120 किमीची सर्वोच्च वेग मर्यादा निश्चित केली आहे. 4 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एक्स्प्रेस वेवर दुचाकी, ऑटो रिक्षा आणि क्वाड्रिसायकलला परवानगी दिली जाणार नाही. त्यामूळे ट्रान्सपोर्ट आणि चारचाकी वाहनांना वेगाने प्रवास करण्यात सुलभता होणार आहे.

या पर्यटनाला मिळणार चालना

समृद्धी महामार्गा प्रवास करतांना शिर्डी, वेरूळ, लोणार, अजिंठा अशा अनेक पर्यटनालाही चालना दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजुने नवीन नगरे सुद्धा उभारण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले आहे.

शिर्डीहून मुंबईच्या दिशेने राहिलेल्या दुसऱ्या टप्याचे काम वेगाने सुरू आहे. जसजसा रस्ता पुर्ण होत राहील त्याप्रमाणे नागरिकांसाठी सुरू केला जाणार आहे. येत्या आठ महिन्यात दुसरा टप्याचे काम पुर्ण होणार आहे.

- राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी