.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai Sawantwadi Railway Express
ठाणे - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यानची नियमित दैनिक एक्स्प्रेस सेवा गुरुवार, ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या नव्या रेल्वेसेवेला गुरुवारी दुपारी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान, ठाण्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून कोकणवासीयांसमवेत या गाडीचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.