Schizophrenic Mother Killed Son in Bandra: एका ३६ वर्षीय महिलेने तिच्या १० वर्षांच्या मुलाची वायरने गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. अभिलाषा औटी असं या महिलेचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे आरोपी महिलेला स्क्रिझोफेनिया हा आजार असून त्यातून तिने ही हत्या केल्याचं पुढे आलं आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.