

Mumbai School Bus Tree Fall Incident: Vihaan Dies
Esakal
Chembur School Bus Accident: स्त्यालगतचे पिंपळाचे भलेमोठे झाड धावत्या स्कूल बसवर कोसळल्याने मुंबईत मंगळवारी एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले. विहान श्रीवास्तव (वय ११) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. धक्कादायक बाब म्हणजे विहानच्या घरासमोर बस येताच ही दुर्घटना घडली. युनिव्हर्सल हायस्कूलची स्कूल बस १२ विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडण्यासाठी जात होती. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चेंबूर येथील हेरिटेज प्राईड इमारतीसमोर रस्त्याशेजारील पिंपळाचे झाड उन्मळून थेट बसवर पडले. Mumbai Rain Tragedy: Tree Collapse on School Bus Kills Vihaan