esakal | मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाच्या हालचालींना वेग
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाच्या हालचालींना वेग

मुंबई आणि परिसरातील शाळा येत्या सोमवारपासून म्हणजेच १८ जानेवारीपासून सुरु करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागानं आयुक्तांकडे पाठवला आहे.

मुंबईत सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाच्या हालचालींना वेग

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः २३ नोव्हेंबर २०२० पासून राज्य सरकारनं शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अनेक जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या. मात्र मुंबई महापालिकेनं शाळा पुढच्या महिन्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत. अशातच मुंबई आणि परिसरातील शाळा येत्या सोमवारपासून म्हणजेच १८ जानेवारीपासून सुरु करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागानं आयुक्तांकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्यातल्या इतर जिल्हा आणि भागातील बऱ्याच शाळा सुरु झाल्या आहेत. मुंबई आणि ठाणे वगळता नववी ते बारावीचे वर्ग सुरु झालेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढताना दिसत आहे. तसंच मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभावही कमी होत चालला आहे. 

गेल्या महिन्यात कोरोनाचा पुन्हा प्रार्दुभाव वाढण्याच्या भीतीनं मुंबई आणि ठाण्यातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई पालिकेनं घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याच्या हालचाली पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सुरु करण्यात आल्या आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पालिकेच्या शिक्षण विभागानं १८ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. या प्रस्तावानुसार मुंबईतल्या नववी ते बारावीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पालकांचं संमतीपत्र आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली नसल्याचा अहवाल देणं आवश्यक आहे. 

शाळांची स्वच्छता, र्निजतुकीकरण करण्यास पालिकेच्या शिक्षण विभागानं सुरु केलं आहे. थर्मामीटर, ऑक्सिमीटर, साबण हे पालिकेच्या अखात्यारितील शाळांना उपलब्घ करुन देण्यात येणार आहे. तसंच आयसोलेशन कक्षासाठी घेण्यात आलेल्या शाळांचेही र्निजतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हेही वाचा- मुंबईत कावळे- कबूतरांच्या मृत्यूच्या घटना; मात्र कोंबड्यांची माहितीच नाही

Mumbai schools start next Monday bmc proposal education department

loading image