

Mumbai Dam Water Stock
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत असून पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ८९.०८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. ज्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.