

Share Rickshaw Fare Hike
ESakal
मुंबई : रेल्वेस्थानक असो किंवा बसस्थानकापासून इच्छितस्थळ दूर असल्याने अनेकांना रिक्षाचा पर्याय स्वीकारावा लागतो. याचाच गैरफायदा घेत शेअर रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. तसेच त्याठिकाणी मीटर रिक्षा थांबू नये, यासाठी दादागिरी करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.