esakal | 'आमचं अंतरंगच भगवं'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai shiv sena melava cm uddhav thackeray speech we are saffron colour

जमलेल्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो, अशाच शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.

'आमचं अंतरंगच भगवं'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : आज, एका बाजुला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या झेंड्याचा रंग भगवा केला. त्याचवेळी शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'आमचं अंतरंग भगवचं आहे,' असा टोला मनसेचे नाव न घेता लगावला आहे. मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या, उद्धव ठाकरे यांच्या सत्कार सोहळ्याची सांगता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाषणाने झाली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन-तीन विषयांवर थेट भाष्य केलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?
जमलेल्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो, अशाच शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री म्हणाले, 'आज 23 जानेवारी. मला आजवरचे सगळे 23 जानेवारी आठवत आहेत. आजचा सत्कार माझा नाही. तुमचा कुटुंब प्रमुख आहे, सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी मिळेल, त्यापासून मी पळ काढणार नाही. मी मुख्यमंत्री होणं ही माझी वचनपूर्ती नाही. तर, वचनपूर्तीच्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. मुळात आपल्या तेव्हाच्या मित्र पक्षानं वचन मोडलं. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत त्यांनी दिलेलं वचन मोडलं. मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. पण, मी नुस्ता उद्धव ठाकरे नाही तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुमच्या समोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी एवढच सांगतो, प्राण गेला तरी मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही.' 

आणखी वाचा - तर, हिंदू म्हणून अंगावर जाईन : राज ठाकरे

'जबाबदारी स्वीकारायला घाबरत नाही'
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'मी मुख्यमंत्री होण्याचं वचन दिलं नव्हतं. आव्हानाला घाबरत नाही. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात. तोपर्यंत मला कोणाचीही भिती नाही. तुम्ही या कुटुंबाला प्रेम दिलं. हे कुटुंब तुमचा कधीच विश्वासघात करणार नाही. मी वेगळा मार्ग जरूर स्वीकारला. 40 वर्षे विरोधात होते. त्यांनासोबत घेऊन, सरकार स्थापन केलं. आता अनेकांना असं वाटतं की भगवा खाली ठेवला. पण, आमचा रंग भगवाच आहे. आमचं अतरंग भगवचं आहे. आम्ही रंग बदलला नाही.' आमचा चेहरा उघड झाला अशी टीका करतात. पण, तुम्ही तर सगळेच उघडे झाला आहात, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.