..तर हिंदू म्हणून अंगावर जाईन - राज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

'राज'कीय कात टाकली..   

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पहिलावाहिला महामेळावा पार पडला. सकाळीच राज ठाकरे यांनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं आणि राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करताना पाहायला मिळणार हे स्पष्ट झालेलं. अशात उत्सुकता होती ती राज ठाकरे यांच्या भाषणाची. भाषणाची सुरवात करताना राज ठाकरे यांनी सर्वांना झेंडा आवडला का? हे ना विसरता विचारलं. येत्या ९ मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १४ वर्ष पूर्ण होतील, याच पार्श्वभूमीवर  गेल्या काही महिन्यांपासून आम्ही अधिवेशन घेण्याचा विचार करत होतो. अधिवेशन घेतल्याने सर्व एकत्र येतात, एकमेकांची भेट घेतात. सध्या अधिवेशनाची परंपरा कमी होतेय, म्हणून आजचं अधिवेशन असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. 

राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे 

मला पक्षात 'तसे' प्रकार होताना दिसता कामा नये :

सोशल मीडिया,  फेसबुक ट्विटर आणि इतर गोष्टींवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करतात. कोणतीही गोस्ट फेसबुक किंवा ट्विटरवर वाईट पद्धतीने आलेली चालणार नाही. काही मत व्यक्त करायचं असेल तर जेष्ठ नेते किंवा माझ्याशी संपर्क साधा. मात्र सोशल मीडियामुळे कोणतीही अनुचित गोष्ट मला आढळली तर त्यांना पदावरून दूर केलं जाईल. तुम्हाला पदाचा मान राखावाच लागेल.   

मोठी बातमी - "राज ठाकरे यांच्या हिंदुत्वामागे शरद पवार यांचं डोकं"
 

संघटनात्मक शिस्त आणि नोंदणीसाठी सेल तयार करणार :

संघटनात्मक शिस्त आणि नोंदणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सेल तयार केली जाणार आहे. याची सर्वांसी जबाबदारी मनसेच्या दोन व्यक्तींवर असणार आहे. ज्यांना संघटना म्हणून काम करायचं असेल त्यांनी राजगडावर जाऊन नोंदणी करावी, बारामतीचे पाटसकर आणि वसंत फडके यांची नेमणूक या सेलसाठी केलेली आहे.  

शॅडो कॅबिनेट 

सकाळपासून मनसेच्या शॅडो कॅबिनेटच्या चारच होत्या. त्यावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सर्वांना माहिती दिली. माहिती दिल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मंत्री योग्य पद्धतीने काम करतेय का नाही यावर नजर ठेवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. आपलं सरकार आल्यावरपण देखील ते करणं अपेक्षित असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.  

झेंडा : पक्षाचा ध्वज का बदलला ?

२००६ साली जेंव्हा मनसेची स्थापना केली तेंव्हा मनातला जो झेंडा होता तो हा झेंडा. मी माझ्या पहिल्या सभेत सांगितलेलं, जेंव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेंव्हा माझे आजोबा तिथे होते. त्यांनीच 'शिवसेना' हे नाव दिलं. त्या आधी अस्तित्वात असलेल्या 'संयुक्त महाराष्ट्र समिती'चा हाच झेंडा होता. शिवसेनेच्या स्थापनेनंतर पुढे वेगळा झेंडा घेतला गेला. 

झेंड्याचा अवमान होता काम नये "

या झेंड्यावर महाराजांची राजमुद्रा आहे, हा इतर कुठला झेंडा नाही, तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसता कामा नये. राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे.आपण दोन झेंडे आणले आहेत. निवडणुकीच्या वेळेत शिवमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान राखला गेला पाहिजे. कुठेही त्याचा गोंधळ होता काम नये. 

या आधीदेखील झेंडे बदललेत :

पक्षाचा झेंडा बदलणे हे आज मनसे करतोय अशातली गोष्ट नाही, जनसंघाने देखील आपला झेंडा आणि पक्षाचं नाव बदललं आहे. कात टाकावी लागते, एक नवीन ऊर्जा द्यावी लागते. सकारात्मक गोष्टींसाठी बदल अत्यंत गरजेचे आहेत. म्हणून हा निर्णय घेतला. 

मोठी बातमी  महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का...

 मराठी आहे, मी हिंदू देखील आहे :

एक आजच सांगूत ठेवतो, मी मराठी आहे  आणि मी हिंदू देखील आहे. माझी भाषणे काढून पाहा.  माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर धावून जाईन आणि धर्माला नख लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन. मला माहितीये पुढे कसं जायचंय. माझे विचार स्वच्छ आहेत, सरळ आहेत. जे देशाशी प्रामाणिक मुसलमान आहेत ते आमचेच आहेत. आंम्ही अब्दुल कलामांना नाकारू शकत नाही, झहीर खानला आम्ही नाकारू शकत नाही. जावेद अख्तरांसारखी व्यक्ती आपण नाकारू शकत नाही. उर्दू ही मुसलमानांची भाषा कधीच नव्हती. भाषा कुठल्याही धर्माची नसते भाषा ही कुठल्याही रिलीजनची नसते ती एका रिजन ची असते. मात्र मी सरसकट हे मान्य करणार आहै. जे कोणी इथे धिंगाणा घालणार त्याविरोधात मी बोलणार. 

तेव्हा हिंदुत्वाबद्दल कुणी नाही विचारलं.. :

रजा अकादमी च्या लोकांनी जेंव्हा मोर्चा काढलेला आणि पोलिस भगिनींच्या अंगावर हात टाकलेला तेंव्हा मनसेने आंदोलन केलेले. पाकिस्तानातील कलावंतांना हाकलण्याचं काम मनसेने केलेलं . तेंव्हा कुणी तुम्ही हिंदू म्हणून विचारलं नाही. आपल्या सणांवर बंधन आली तेंव्हा फक्त मनसे उभी राहिली.  हे मी आज नाही बोलत, आ आगोदर देखील मी हेच म्हणालोय. धर्म प्रत्येकानी आपल्या घरात ठेवावा. नमाज पढू नका असं आम्ही सांगत नाही.. नमाज पढा मात्र भोंगे लावून का पढताय ? आमची आरती त्रास देत नाही, भोंगे का देतायत ? पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना हाकलून द्या, असं मी अनेकदा बोललोय. मग आज हा प्रश्न का विचारला जातोय? 

मोठी बातमी - संजय राऊत , शरद पवारांच्या फोनचं टॅपिंग? ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..

पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या :

मला एक व्यक्ती भेटलेत. बांगलादेशातून भारतात यायचं असेल तर अडीच हजार रुपये लागतात. पहिल्यांदा तुम्ही समझोता एक्सप्रेस बंद करा. ३७० हटवल्यावर मी सत्कारच अभिनंदन केलंय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर मी सर्वात आधी म्हणालेलो आज बाळासाहेब असायला हवे होते. नागरिकत्व सुधारणा कायदा चर्चा होऊ शकते. बाहेरून आलेल्या सगळ्याची माहिती पोलिसांना आहे. माझं मुंबई आणि महाराष्ट्रातील पोलिसांवर विश्वास आहे. एकदा पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या, बघा काय करतील. 

राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० हटवण्याचा राग : 

अचानक देशभारत मोर्चे निघायला लागलेत. हजारो मुस्लिम रस्त्यावर आले आहेत. राम मंदिर आणि काश्मीरमधील ३७० हटवण्याचा राग रस्त्यावर काढला जातोय. त्यामध्ये भारतीय मुसलमान किती होते आणि बाहेरच्या मुसलमानांना इथले मुसलमान साथ देत असतील तर कशाला पाहिजेत ? 

मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो : 

राज ठाकरे यांचा रंग तोच आहे, मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो.  हे धोके आपण नीट समजून घेणे गरजेच आहे. राज ठाकरे कधी विरोधासाठी विरोध करत नाही. पण जे चुकीचं आहे ते चुकूच म्हणून सांगतो. 

मोठी बातमी - अनेक महिन्यांपासून मृतदेह शवागारात; वाचा काय झाले

केंद्राला पूर्ण पाठिंबा ​

थोडा त्रास झाला तरी चालेल, पण हे व्हायला हवं. या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या देशातील बांगलादेशी मुसलमान आणि पाकिस्तानी मुसलमान हाकलून देणं गरजेचं आहे. यासाठी मी केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रात असे काही भाग आहेत. याबद्दल मी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांना माहिती देणार आहे. या भागात मौलवी काय करतात हे समजत नाही,  मात्र भारताविरोधात मोठा डाव शिजतोय. सरकारला ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळा हात द्यायला हवा. 

दरम्यान सर्वात शेवटी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व परिस्थितीवर गुढीपाडव्याला बोलणार असल्याचं स्पष्ट केलंय. 

raj thackeray targets pakistani and bangladeshi muslims in his mahamelaw speech


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray targets pakistani and bangladeshi muslims in his mahamelaw speech