esakal | कोविड केंद्राबाहेर रिक्षामध्येच आईने सोडले प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

auto

मुलगा आईचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न करत होता, पण...

कोविड केंद्राबाहेर रिक्षामध्येच आईने सोडले प्राण

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: कोरोनामुळे देशात सध्या अत्यंत गंभीर स्थिती आहे. बेड न मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रुग्णांचे मृत्यू होत असल्याच्या बातम्या दररोज येत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये मनाला चटका लावणारी अशीच एक घटना समोर आली आहे. दिल्ली कोविंड केंद्राबाहेर मुलगा रस्त्यावर फुटपाथवर बसला होता, आणि आईचा मृतदेह आत रिक्षामध्ये होता. आईला कोविड केंद्रात दाखल केल्यास तात्काळ उपचार मिळतील, म्हणून मुलगा प्रवेश मिळवण्यासाठी बरेच तास प्रयत्न करत होता.

हेही वाचा: भारतावरील संकटाने ब्रेट ली गहिवरला; बिटकॉईनच्या रुपात केली मोठी मदत

मुकूल व्यास (२८) आज सकाळी दक्षिण दिल्लीत उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल कोविड केंद्रात आईला दाखल करण्यासाठी घेऊन आला. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस हे कोविड केंद्र चालवतात. दक्षिण दिल्लीतील या कोविड केंद्राचे दरवाजे शेवटपर्यंत उघडले नाहीत.

हेही वाचा: ICU बेडवरुन राडा, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्सेसवर हल्ला

अखेर तीन तासांनी किरण व्यास (५२) यांनी रिक्षामध्येच प्राण सोडले. मुकूलचा भाऊ आईचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो पर्यंत उशीर झाला होता. "त्यांनी माझ्या आईला मारलं. आता तिला मी कुठे घेऊन जाऊ?. मी इथे थांबून बरेच तास वाट बघितली. ते मला प्रक्रिया पूर्ण करायला सांगत होते. मी रडून अनेकांकडे मदत मागितली. पण कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. अखेर माझ्या आईचा मृत्यू झाला" असे मुकूलने सांगितले.

"कोण मरत असेल, तर १०० प्रक्रिया पूर्ण करु शकतो का? कोणी मदत केली नाही" अशी खंत मुकूलने व्यक्त केली. सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत या कोविड केंद्रात पूर्णपणे गोंधळ सुरु होता. ५०० बेडच्या या केंद्रात रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी नातेवाईक बाहेर वाट पाहत होते.

loading image