मुंबईत गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान, दिवसा 28.8 तापमानाची नोंद

मिलिंद तांबे
Sunday, 13 December 2020

मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा येथेही अनुक्रमे 28.8  डिग्री सेल्सियस आणि 28 डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. 2014 पासूनचे हे सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई: मुंबईत सांताक्रूझ आणि कुलाबा येथेही अनुक्रमे 28.8  डिग्री सेल्सियस आणि 28 डिग्री सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. 2014 पासूनचे हे सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर शनिवारी सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

11 डिसेंबर रोजी अवकाळी पाऊस पडल्यानंतर मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी, 12 डिसेंबरला हलका पाऊस किंवा वादळी वादळासह अंशतः ढगाळ आकाश असण्याची शक्यता वर्तविली होती. दरम्यान, शनिवारी आयएमडीच्या सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेत किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर सांताक्रूझ आणि कुलाबा येथेही अनुक्रमे 28.8  अंश सेल्सियस आणि 28 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

कुलाबा वेधशाळेत 1.4 मिमी पावसाची नोंद झाली, सांताक्रूझमध्ये 0.7 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकणातही सकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा Mumbai local train update: आज मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल वेळापत्रक

“गेल्या काही दिवसांत शहराच्या कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असली तरी पावसाच्या सरीमुळे ही शहरात गारवा पसरला आहे” असे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. 

मुंबईत अवेळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसली तरी दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बर्‍याच भागात येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसचे धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातही 13 ते 15 डिसेंबर दरम्यान सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
 
राज्यातील अनेक भागात पावसाच्या सरी

मुंबईसह राज्यातील काही भागात सलग दुस-या दिवशी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण दिसले. पारा घसरल्याने दिवसा देखील गारवा जाणवला.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यातील पावसाचे प्रमाण
कुलाबा - 1.4 मिमी
सांताक्रूझ - 0.7 मिमी 

 
शिरपूर - 13 मिमी
थालनेर - 34 मिमी
टोलनाथे - 30 मिमी
अर्थे - 28 मिमी
जवखेडा - 25 मिमी
बोराडी - 25 मिमी
सांगवी - 60 मिमी
एकूण - 215 मिमी
 
नंदूरबार - 41 मिमी
नवापूर - 20 मिमी
शहादा - 29 मिमी
तलोडा - 18 मिमी
अक्कलकुवा - 12 मिमी
अक्रानी - 16 मिमी 
साक्री - 21 मिमी
कसारे - 13
निजामपूर - 22
दुसाने - 34 
म्हसडी पारनेर - 23
पिंपळनेर - 28 
ब्राम्हणवेळ - 45 
कुडाशी - 34 
उमरपट्टा - 38 
दहिवेल - 34 
डोंडाईचा - 14 
विखरण - 28
शेवडे - 20 

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Skymet weather lowest minimum temperature winter


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Skymet weather lowest minimum temperature winter