सावध व्हा, हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' भागात पुन्हा वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

मिलिंद तांबे
Tuesday, 15 September 2020

जी उत्तरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा रूग्ण वाढले असून दिवसभरात 116 नव्या रुग्णांची भर पडली. धारावीसह दादर,माहिममध्ये देखील बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. ऑगस्टपासून पुन्हा दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव काही प्रमाणात आटोक्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यात जी उत्तर भागातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताहेत.  जी उत्तरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा रूग्ण वाढले असून दिवसभरात 116 नव्या रुग्णांची भर पडली. धारावीसह दादर,माहिममध्ये देखील बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. धारावीमध्ये दिवसभरात 23 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 2,938 इतकी झाली आहे.  156 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

दादरमध्ये सोमवारी 39 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 3,033 इतकी झाली आहे.  484 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये  54 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2,762 इतकी झाली. तर 506 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात 116 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 8,733 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 524 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  धारावीमध्ये 2,512, दादरमध्ये 2,447 तर माहिममध्ये 2,167 असे एकूण 7,126 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,146 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अधिक वाचाः  भीषण वास्तव : कोरोनाचा मुक्काम लांबल्यास 30 टक्के दुकाने बंद होण्याची शक्यता
 

मुंबईत रूग्णवाढ सुरूच

मुंबईतही सोमवारी बाधित रुग्णांचा आकडा वाढला असून 2,256 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,71,949 झाली आहे. रूग्णवाढीचा दर 1.24 टक्क्यांवर  स्थिर आहे. मुंबईत सोमवारी 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,178 वर पोचला आहे. मुंबईत 1,431 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे. 

मुंबईत नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 24 जणांना दीर्घकालीन आजार होते. सोमवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 18 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी तिघांचे वय 40 वर्षा खालील होते.  24 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 4 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.

हेही वाचाः  एकदा निगेटिव्ह झालेल्या रुग्णांवर पुन्हा उलटतोय कोरोना? 13 जणांचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह
 

सोमववारी 1,431 रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत 1,32,349 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे. तर 13 सप्टेंबरपर्यंत एकूण 9,25,148  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.24 वर स्थिर आहे. 

------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Mumbai Slum cluster dharavi  156 new cases G north cases increase


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Slum cluster dharavi 156 new cases G north cases increase