esakal | मुंबई : एसटीला गणपती पावला !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : एसटीला गणपती पावला !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या जादा गाड्यांच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला तब्बल सात कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवात ५ ते २० सप्टेंबरदरम्यान 'गणपती विशेष' ३२९० बसेसहारे सुमारे तीन लाख ९६ हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा: MSRTC : सोमवारपासून बारामती-पुणे विनावाहक विनाथांबा एसटी सुरु

यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता; परंतु सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखविल्याने अवघ्या दिवसांत जादा गणपती विशेष गाड्या फूल झाल्या होत्या. मिळालेल्या एसटीला चाकरमान्यांकडून प्रतिसादामुळे गणेशोत्सवादरम्यान सुमारे ३२९० गाड्या सोडाव्या लागल्या. ५ ते २० सप्टेंबरदरम्यान तब्बल ३२९० बसेसद्वारे ८२९९ फेल्या पार पडल्या. यामधून एसटीला मात कोटी ८२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे अॅड. परब यांनी सांगितले.

loading image
go to top