esakal | मुंबई : 800 बेंच विकत घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता IMumbai
sakal

बोलून बातमी शोधा

schools

मुंबई : 800 बेंच विकत घेण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगर पालिकेच्या 11 सीबीएसई आणि एक आयसीएसई अशा 12 शाळांसाठी 800 बेंच विकत घेण्याच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीने मान्यता दिली. विद्यार्थ्यांच्या वयानुसार बेंच चा आकार ठरविण्यात आला आहे.

महानगर पालिकेने राज्य बोर्डाबरच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यातील प्रत्येकी एक सीबीएसई, आयसीएसई शाळा सुरु झाली आहे.तर,उर्वरीत शाळाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.त्यासाठी बेंचची खरेदी करण्यात आली आहे.या संपुर्ण खरेदीसाठी महानगर पालिकेने 88 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

हेही वाचा: अमरिंदर सिंग पोहोचले शहांच्या घरी; महत्वाच्या घडामोडी शक्यता

पहिली आणि दुसरीच्या वर्गांसाठी 800 बेंच घेतले जाणार आहेत. त्यासाठी कंत्राटदाराकडून प्रत्येक बेंचसाठी 4 हजार 770 रुपये या प्रमाणे 38 लाख 16 हजार खर्च होणार आहे. तिसरी आणि चौथीच्या वर्गांसाठी 400 बेंच घेतले जातील. त्यासाठी प्रत्येकी 5 हजार 211रुपये खर्च करण्यात येणार आहे.तर,सर्व बेंचसाठी 20 लाख 84 हजाराचा खर्च होणार आहे.सर्व करांसह हा खर्च 88 लाखा पर्यंत जाणार आहे.

loading image
go to top