मुंबईतील स्थानकांचे होणार अत्याधुनिकीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई शहर वाहतूक प्रकल्पांतर्गत मुंबईतील 19 स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. यात पश्‍चिम मार्गावरील आठ, तर मध्य मार्गावरील 11 स्थानकांचा समावेश आहे. 2022 पर्यंत स्थानकाचे अत्याधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबईसह देशातील स्थानकांचे अत्याधुनिकीकरणाचे काम भारतीय रेल्वेस्थानक विकास महामंडळ आणि मुंबई रेल विकास महामंडळ या दोन्ही स्वतंत्र संस्थांनी हाती घेतले आहे. या कामासाठी 880 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव अपेक्षित आहे. यासाठी सर्व स्थानकांचा आराखडा हा त्या स्थानकातील प्रवासी आगमन व निगर्मन करणाऱ्या संख्येवर अवलंबून असेल.

Web Title: mumbai station Modernization