esakal | मुंबईतील 3 हजार 493 भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण | Stray Dogs
sakal

बोलून बातमी शोधा

stray dogs

मुंबईतील 3 हजार 493 भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत गेल्या पंधरा दिवसात 3 हजार 494 भटक्या श्वानांचे (stray dogs) लसीकरण करण्यात आले. रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण (anti rabies vaccination) व जनजागृती पंधरवडा निमित्ताने ही मोहीम राबविण्यात आली. दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात ‘रेबीज (rabies day) दिवस’ पाळला जातो. या अनुषंगाने महानगरपालिकेद्वारे (bmc) दिनांक 28 सप्टेंबर ते दिनांक 13 ऑक्टोबर 2021 या कालावधी दरम्यान रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती (people awareness) पंधरवडा पाळण्यात आला. या अंतर्गत दररोज सकाळी 8 ते दुपारी 2 या दरम्यान करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान 3 हजार 493 इतक्या संख्येतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा: वाडा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

यासाठी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या 2 चमू कार्यरत होत्या. या चमुंमध्ये महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि श्वान पकडण्याकरिता अर्ध पशुवैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश होता. तर पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले.

यामध्ये प्रामुख्याने प्राणीप्रेमी संस्था, द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, मुंबई ऍनिमल्स असोसिएशन व पेट ओनर्स व ऍनिमल लव्हर फाऊंडेशन या संस्थांचा समावेश होता अशी माहिती महानगरपालिकेच्या पशुवैदयकीय आरोग्य खात्याचे महाव्यवस्थापक डॉ. श्री. के. ए. पठाण यांनी दिली आहे. ज्यांच्या घरी पाळीव श्वान आहेत, त्यांनी आपल्या श्वानांना वर्षातून एकदा व निर्धारित दिवशी रेबीज प्रतिबंधात्मक लस ही पशुवैद्यकांकडून अवश्य देववून घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या महाव्यवस्थापकांनी नागरिकांना केले आहे.

loading image
go to top