
दहावीच्या एका 15 वर्षीय विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवला आहे. आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या शाळेबाहेर एका वर्गमित्राला चाकूने जखमी केल्याचा आरोप आहे.
Student Knief Attack : दहावीत शिकणाऱ्या मुलाकडून दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला
मुंबई - कांदिवली पोलिसांनी शुक्रवारी इयत्ता दहावीच्या एका 15 वर्षीय विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवला आहे. 26 नोव्हेंबर रोजी आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या शाळेबाहेर एका वर्गमित्राला चाकूने जखमी केल्याचा आरोप आहे. एका स्थानिक रहिवाशाने चित्रित केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या घटनेची चर्चा सुरू झाली .व्हिडिओची दखल घेऊन, कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326 अंतर्गत गुन्हा नोंदवला.आरोपी मुलगा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहोत. पोलिसांनी त्याच्या पालकांची बोलावून चौकशी करत आहे.
या घटनेमुळे पीडित मुलाच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती, त्याला ट्रायडंट रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या आठवड्यात बुधवारी मुलावर उपचार पूर्ण होत त्याला घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कांदिवली पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी कांदिवली पश्चिमेकडील एका शाळेत शिकतात. घटनेच्या काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते. त्याचा राग ठेवत आरोपी विद्यार्थ्याने रागाच्या भरात पीडित मुलावर हल्ला केला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये 10 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि काही स्थानिक व्यक्ती आरोपी आणि पिडीत मुलामध्ये सुरू असलेली हाणामारी पाहताना मिळत आहेत. पीडित मुलगा स्कूटरवर बसलेला असताना आरोपी मुलाशी त्याचे भांडण झाले . भांडण विकोपाला जाऊन आरोपीने चाकू काढला आणि पिडीत मुलावर हल्ला केला.