Mumbai Crime Newsesakal
मुंबई
Mumbai Crime : संतापजनक! 40 वर्षीय शिक्षिकेचा 11 वीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन ठेवायची संबंध
Mumbai Crime News : आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये (Five Star Hotels) नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले. विद्यार्थ्याने गप्प राहावे, यासाठी ती त्याला नैराश्यविरोधी औषधंही देत होती.
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देशातील अव्वल पाच शाळांपैकी एक असलेल्या मुंबईतील एका नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेला (Woman Teacher) अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. दादर पोलिसांनी (Dadar Police) या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हाही नोंदवला आहे.
