मुंबई : अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका ४० वर्षीय विवाहित शिक्षिकेला अखेर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला. शिक्षिका गेल्या तीन आठवड्यांपासून अटकेत (Mumbai Teacher Arrest) होती.