esakal | तापमानात घट झाल्याने 31 टक्क्यांनी वाढला हृदयविकाराचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

तापमानात घट झाल्याने 31 टक्क्यांनी वाढला हृदयविकाराचा धोका

 तापमान कमी झाल्याने हृदयाला रक्तपुरवठा धमन्यांचे काम संथगतीने चालते. परिणामी रक्तपुरवठा कमी होऊन हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते.

तापमानात घट झाल्याने 31 टक्क्यांनी वाढला हृदयविकाराचा धोका

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई:  तापमान कमी झाल्याने हृदयाला रक्तपुरवठा धमन्यांचे काम संथगतीने चालते. परिणामी रक्तपुरवठा कमी होऊन हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, तापमान 1.8 डिग्री फॅरेनहाइट कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या धोक्यात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होते. 2015 मध्ये आणखी एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, आपण तुलना केल्यास उन्हाळ्याच्या दिवसांपेक्षा थंडीच्या महिन्यात हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण 31 टक्क्यांनी वाढते. ही वेळ अशी आहे जेव्हा एखाद्याच्या रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात आणि यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका संभवतो.

एखाद्याचे शरीराचे तापमान 95 अंशांपेक्षा कमी झाल्यास त्याला हायपोथर्मियाचा त्रास होईल. ज्यामुळे आपल्या हृदयाच्या स्नायूवर त्याचा परिणाम होईल. अशा प्रकारे जे लोक थंड हवामानात जास्त काळ राहतात विशेषत: क्रीडा उत्साही अपघाती हायपोथर्मियामुळे ग्रस्त होऊ शकतात.

हेही वाचा- मृत पक्षांची माहिती तात्काळ द्या, बर्ड फ्लूसाठी ठाणे पालिकेचा नियंत्रण कक्ष

उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान करणारे किंवा तंबाखूचे सेवन करणारे तसेच 60 वर्षांपेक्षा वयाच्या व्यक्तींना हदय विकाराचा त्रास होतो. सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी सांगितले की, थंड वातावरणात उबदार राहण्याचा प्रयत्न करा. लोकरीचे कपडे, हातमोजे घाला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दररोज आपल्या रक्तदाबाचे निरीक्षण करावे. उच्च रक्तदाब समस्याग्रस्त असलेल्यांपैकी जर असाल तर आपल्या क्रमांकावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण असे केल्याने हृदयविकाराचा झटका कमी होऊ शकतो. म्हणूनच, आपण डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावी. मद्यपान प्रतिबंधित करा आणि धूम्रपान पूर्णपणे टाळावे. अल्कोहोलमुळे त्वचेतील रक्तवाहिन्या वाढू शकतात आणि आपल्या शरीराच्या महत्त्वपूर्ण अवयवांमधून उष्णता तापू शकते. त्याचप्रमाणे, धूम्रपान केल्याने एथेरोस्क्लेरोसिस होतो. एवढेच नव्हे तर जे धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयाच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो, हृदयाच्या गती आणि रक्तदाब वाढतो.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Temperature Drop increased risk heart attack by 31 percent

loading image