esakal | मृत पक्षांची माहिती तात्काळ द्या, बर्ड फ्लूसाठी ठाणे पालिकेचा नियंत्रण कक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

मृत पक्षांची माहिती तात्काळ द्या, बर्ड फ्लूसाठी ठाणे पालिकेचा नियंत्रण कक्ष

बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महानगर पालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

मृत पक्षांची माहिती तात्काळ द्या, बर्ड फ्लूसाठी ठाणे पालिकेचा नियंत्रण कक्ष

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

मुंबईः बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगर पालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यांनी केले आहे.

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्कतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीखाली हा नियंत्रण स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ्री-1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- खारघरमध्ये मृत कावळ्याचा संख्येत वाढ,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Report dead birds immediately Thane Municipal Control Room Bird Flu

loading image