

SIR Exercise Could Impact Voter Base Across Maharashtra’s Major Cities
esakal
मुंबई: सध्या सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रिया मोहिमेतून या याद्यांचा 'फुगवटा' फुटणार असून, ९० लाख ते एक कोटी मतदारांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ३० जूनपासून सखोल विशेष फेरतपासणी (एसआयआर) मोहीम सुरू करणार आहे. त्यातून महाराष्ट्रातील आठ टक्के ते १२ टक्के नावे मतदारयाद्यांमधून कमी होण्याची शक्यता आहे.