मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले आहेत. तिथे जल्लोष साजरा करण्यात येईल. .संजय उवाच । संजय उगाच च ॥ असा टोला परेश रावल यांनी हाणला आहे. संजय राऊत यांना हा टोला परेश रावल यांनी हाणला. . मी जिंकलो याचा मला आनंद नाही. एकाच वेळी सर्व दिग्गज नेते पराभूत होतील असं होत नाही. माझा ईव्हीएम वर विश्वास नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी विजयानंतर दिली.महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीपदाचा पॅटर्न कायम राहणार. महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पद कायम राहणार. भाजप महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचाच. शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस यांचा सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार अशी माहीती सुत्रांनी दिली आहे. .पराभवावर भाई जगताप यांनी सुनावले राज्यातल्या नेतृत्वाला खडेबोल राज्यातल्या नेतृत्वावर जबाबदारी घेऊन कारवाई करावी आणि राजीनामा द्यावा जागा वाटपामध्ये काही कॉम्प्रमाईज झालंय का अशी सुद्धा मला संशय आहे मुंबईतल्या आमच्या जिंकणाऱ्या जागा दुसऱ्या पक्षाला दिल्याच कशा माझा राज्याच्या नेतृत्वावर आक्षेप आहे केंद्रातल्या नेतृत्वावर नाही राज्यातल्या नेतृत्वाने आणि मुंबईतल्या नेतृत्वाने जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा भाई जगताप यांची मागणी.शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. कोपरी- पाचपाखाडी या आपल्या बालेकिल्ल्यात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे यांचा केवळ दारुण परावभ केला नसून त्याच्यांवर डिपोझिटही जप्तीची नामुष्की आणली आहे..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून दिल्या विजयाच्या शुभेच्छा.वरळीकरांचे आभार , मित्रपक्षांचे आभार आम्हाला ऑनग्राऊंड जो निकाल वाटत होता तो दिसला नाहीय महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय?- हा प्रश्न लोकसभेत याच महाराष्ट्रानं आम्हाला आशिर्वाद दिला, मात्र या निकालावर विचार, चर्चा होईल.शिष्य गुरु वर भारी पडला जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयीमनीषा वायकर यांचा 1522 मताने केला पराभव. शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे..मुंबईच्या मुख्य भाजप कार्यालयात जिलेब्या तयार झाल्या आहेत. फडणवीसांच होणार जंगी स्वागत. .महायुतीच्या भव्य विजयानंतर शपथविधीही भव्य होणार आहे. महायुतीकडून शिवाजी पार्क आणि वानखडे स्टेडिअमवर शपथविधी घेण्याबाबत विचार सुरू आहे. सोमवार किंवा मंगळवारी शपथविधी घेण्याबाबत विचार सुरू आहे. .मागाठाणे विधानसभा मतदार संघातून प्रकाश सुर्वे यांची हॅट्रिक५८ हजार ०३२ मतांची लिड.Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेलं अभूतपूर्व यश हे राज्यातील जनतेनं महायुतीच्या विकासकाम तसंच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचं प्रतिक आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कष्टातून आज हे यश मिळालं आहे..Eknath Shinde : 50 पैकी एकही आमदार...; एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल.बेलापूर विधानसभेत मंदा म्हात्रेंचा 415 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी संदीप नाईकांचा पराभव केला आहे. . आदित्य ठाकरे वरळीत विजयी झाले आहेत. त्यांनी मिलिंद देवरा व संदिप देशपांडेंचा पराभव केला आहे. .राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. अमित ठाकरेंचा पराभव झाला आहे. महेश सावंत विजयी झाले आहेत. .महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार?विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक २८+१ =२९ सदस्यांची संख्या सध्या कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाहीसत्ता स्थापन करताना एकत्रित येऊन संख्याबळ सादर कराव लागत मात्र विरोधी पक्षनेता निवडताना किमान एका पक्षाकडे २९ सदस्य असणं गरजेच आहेसध्या विरोधी पक्षातील कोणताच पक्ष अपेक्षित संख्याबळ गाठत नाही.माहिम विधानसभा चौदावी फेरी उबाठा- महेश सावंत- 37259शिवसेना- सदा सरवणकर- 36105मनसे- अमित ठाकरे- 25162महेश सावंत आघाडीवर.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद दुपारी साडेतीन वाजता वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद.प्रशांत ठाकूर आघाडीवरपनवेल विधानसभा मतमोजणीप्रशांत ठाकूर( भाजपा) - 96018बाळाराम पाटील(शेकाप)- 73044लीना गरड (उबाठा) -29292आघाडी: 22974 प्रशांत ठाकूर.पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला वसई तालुक्यातील बविआ हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला वसई, नालासोपारा, डहाणू, विक्रमगड विधानसभेत भाजपा, तर पालघर- बोईसर मध्ये शिवसेना शिंदे गट आघाडीवर.नवव्या फेरीत मालाड पश्चिम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवरतर काँग्रेसचे असलम शेख पिछाडीवरविनोद शेलार - 42310असलम शेख - 34866.जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या वाटेने वाटचाल. मतमोजणी केंद्राबाहेर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा ढोल ताशांच्या गजरात जल्लोष! .राज्यात महायूतीला मिळालेल्या यशासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार हे आघाडीवर आहेत. सातव्या फेरी अखेरीस त्यांना 28 हजार 606 मतांची आघाडी मिळाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार असिफ जखेरीया यांना 14875 इतकी मते मिळाली आहे..महायुतीच्या महाविजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा एकच जल्लोष केला. यावेळी खासदार शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून विजयाचा जल्लोष केला. हा विजय महायुतीने गेल्या दोन वर्षात घेतलेले अनेक निर्णय आणि लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अभियान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली अथक मेहनत याचा विजय असल्याचे खासदार शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले..मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल १७व्या फेरीअंती मंगल प्रभात लोढा यांना ५५,५५० मतांचं मताधिक्यमंगल प्रभात लोढा यांना ८४,८९७ मतं तर ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना २९,३४७ मत.आदित्य ठाकरे सातव्या फेरीअखेर ९९७ मतांनी आघाडीवर आले आहेत. आकडेवारीआदित्य ठाकरे - 25304मिलिंद देवरा - 24307संदीप देशपांडे - 11302. मुंब्रा मतदार संघात जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत जितेंद्र आव्हाड 56933नजीब मुल्ला 35374सुशांत सूर्यराव 10950जितेंद्र आव्हाड 21559 मतांनी आघाडी.ठाकरेंनी आपली सेना आता विसर्जित करावी, व्होट जिहादला उत्तर धर्म युद्धाने दिला आहे. हा धर्मयुद्धाचा विजय आहे . कोव्हीड काळात जो भ्रष्टाचार झाला . त्याला जनतेने उत्तर दिलं. संजय राऊत यांनी केलेला भ्रष्टाचाराला उत्तर दिले असे किरीट सोमय्या म्हणाले.वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव आणि भाजपकडून कालिदास कोळंबकर हे आमनेसामने होते. .आदित्या ठाकरे पिछाडीवर असल्याचे समोर यात आहे. .बेलापूर विधानसभेत मंदा म्हात्रे भाजप 770 मतांनी आघाडीवर आहेतमंदा म्हात्रे भाजप - 15364संदीप नाईक राष्ट्रवादी -14594विजय नाहटा अपक्ष - 3501 मंदा म्हात्रे भाजप 770 मतांनी आघाडीवर. वर्सोवा विधानसभा सहाव्या फेरी अखेर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हरून खान आघाडीवरहारून खान यांनी घेतली 2896 मतांची आघाडीभारती लवेकर भाजप 15665 संदेश देसाई मनसे 1291हारून खान शिवसेना ठाकरे गट 18 561 रईस लष्करीया एम आय एम 1479राजू पेडणेकर अपक्ष 2924एकूण मते 41,179 हारून खान यांनी घेतलेली आघाडी 2896.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ सहावी फेरी... प्रमोद उर्फ राजू पाटील (मनसे) : 1775राजेश मोरे (महायुती) : 5696सुभाष भोईर (महाआघाडी) : 1933महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 18114 मतांनी आघाडीवर .पुन्हा निवडणुका घ्या.महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही!असा निकाल लागूच शकत नाही.असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे .महायुती 26 तारखेच्या आत सरकार स्थापन करणार अशी माहीती नरेश म्हस्के यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे अशी इच्छा आहे असेही ते म्हणाले .भाजपच्या मनीषा चौधरी 8010 मतांनी आघाडीवरपाचव्या फेरी अखेर भाजपच्या मनीषा चौधरी 8010 मतांनी आघाडीवर1- विनोद घोसालकर (UBT शिवसेना)- 143972- मनीषा चौधरी (भाजपा)- 264073- राजेश एरुणकर (MNS)- 16174- ममता शर्मा - 1625 अशोक गुप्ता- 406- कल्पेश पारिख- 39लिड- 8010. अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे मुर्जी पटेल 5899 मतांनी आघाडीवर आहेत. मुर्जी पटेल यांना पाचव्या फेऱ्या खेळ 23 हजार 93 मते मिळाली आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 17194 मते मिळाले आहेत. .दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार मनीषा चौधरी या 6170 मतांनी आघाडीवर आहेत. मनीषा चौधरी यांना 17978 मते तर विनोद गोसाळकर यांना 8405 मते मिळाली आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये मनसेला मोठा धक्का बसू शकतो, याचे कारण म्हणजे एकमेव आमदार असलेले राजू पाटील पिछाडीवर आहेत. - शिवसेना शिंदे - राजेश मोरे : 4916- शिवसेना ठाकरे - सुभाष भोईर : 2171- मनसे - राजू पाटील : 2079- नोटा - 65एकूण मतदान - 20214.वसईत बविआ हितेंद्र ठाकूर आणि भाजपा च्या स्नेहा दुबे मध्ये काट्याची टक्कर सुरूहितेंद्र ठाकूर 5 व्या फेरी अखेर केवळ 661 मताने आघाडीवर.मालाड विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार विनोद शेलार १५२२ मतांनी आघाडीवर आहे. .शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाने आघाडी घेतली आहे. अजय चौधरी यांना 7570 मतं मिळाली आहेत तर बाळा नांदगावकर 6301 मिळाली आहे. .भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघ 3 री फेरी पराग शाह भारतीय जनता पार्टी 12601 राखी जाधव राष्ट्रवादी पार्टी शरद पवार 7427 पराग शाह 5174 मतांनी आघाडीवर.दादर माहीम मतदार संघात अमित ठाकरे पिछाडीवर आहेत. तर महेश सावंत आघाडीवर आहेत. अमित ठाकरे - ३४४३महेश सावंत - ५६९२सदा सरवणकर - ४०३०दुसऱ्या फेरीत देखील महेश सावंत १६६२ मतांनी आघाडीवर. मुंब्रा मतदार संघात पहिल्या फेरीत जितेंद्र आवड आघाडीवर आहेत. जितेंद्र आव्हाड 8262नजीब मुल्ला 4726सुशांत सूर्यराव1696नोटा 266.वरळी विधानसभाप्रथम फेरीआदित्य ठाकरे - ४,२३१मिलिंद देवरा - ३,७३६संदीप देशपांडे - २,३९९आदित्य ठाकरे पहिल्या फेरीत ४९५ मतांनी आघाडीवर.ऐरोली मतदारसंघात 2100 मतांनी भाजपचे गणेश नाईक आघाडीवर..वांद्रे पूर्व पहिली फेरी झिशान -२१२९ तृप्ती सावंत १४९९वरुण सरदेसाई २७९१ सरदेसाई-६६२ मतांनी आघाडीवर.मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर आहेतअबू आझमी ३८८४नवाब मलिक ४६१सुरेश पाटील ३७७अतिक खान AImIM ३६१७मोहम्मद सिराज २७८.वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे 495 मतांनी आघाडीवर आहेत .वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर आघाडीवर आहेत१. हितेंद्र ठाकूर (बविआ) - 3,722२. स्नेहा दुबे-पंडीत (भाजपा) - 2,71.मुंब्रा कळवा मधून जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत. .बेलापुरमधून मंदा म्हात्रे १५०० मतांनी आघाडीवर. त्यांच्या विरोधात संजिव नाईक उभे आहेत .वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर.ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४००० हजार मतांनी आघाडीवरतर ठाणे शहर मधून संजय केळकर आघाडीवरकळवा मुंब्रा - जितेंद्र आव्हाड आघाडीवर.ओवळा माजिवडा मधून प्रताप सरनाईक आघाडीवर.विक्रोळी पोस्टल मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत आघाडीवर.घाटकोपरमधून पुर्वमधून राम कदम आघाडीवर आहेत. .ज्योती गायकवाड आघाडीवरज्योती गायकवाड यांना २१८ मत राजेश खंदारे यांना ८३ मत.डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजप रवींद्र चव्हाण आघाडीवर.कांदिवली पूर्व मतदार संघातून भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर.टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर.मलाड (प) मध्ये अस्लम शेख आघाडीवर .मातोश्रीबाहेर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे पोस्टर पहायला मिळत आहे. .मलबार हिल मतदार संघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर टपाली मतदानात मंगल प्रभात लोढा आघाडीवर.कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. .जिशान सिद्धिकी आघाडीवरीवर असल्याची माहीतीवरुण सरदेसाई पिछाडीवर .राज्यात मतमोजणी केंद्रात मतमोजणीला सुरवात. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वपूर्व पाऊल उचलण्यात आलंपक्षाकडून गेल्या २ दिवसांत उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलंनिवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू असा प्रतिज्ञापत्रावर उल्लेखपक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी आधीच काळजी दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती .मुंबईच्या दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार,मतदार केंद्रात पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये कॉर्डिनेशन चा फेलियर,मागील दीड तासापासून माध्यमाच्या प्रतिनिधींना बाहेर थांबवून ठेवलेत....काही मिनिटातच उघडली जाणार स्ट्रॉंग रूम साडे सात वाजता स्टाँग रूम उघडली जाणार उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष स्ट्रॉंग रूम उघडली जाणार तर सकाळी आठच्या ठोक्याला मतमोजणीला होणार सूरवात पोस्टल बॅलेट च्या मतमोजणी नंतर ईव्हीएम मशीन उघडली जाणार.माहीम विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकेल. अमित ठाकरे विजयी होतील असा विश्वास मनसेचे विद्यार्थी सेनेचे संघटक यश सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.. माहीम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यास मतदारसंघांमध्ये कुठल्याही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन शक्ती प्रदर्शन करू नये आणि तणाव वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे करण्यात आला आहे. .मुंबईत मतमोजणीला ८ वाजता सुरवात होणार आहे. . महायुतीच्या मुंबादेवी मतदार संघाच्या उमेदवार शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्यामतमोजणी सुरू होण्यापूर्वी त्या बाप्पाच्या दर्शनाला पोहोचल्या आहेत.महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही मात्र मातोश्री च्या रिंगणात पुन्हा एकदा कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री अशा पद्धतीचे पोस्ट सध्या पाहायला मिळत आहे.निकालाआधीच बोरिवलीत भाजपकडून महाजल्लोष विजय यात्रेचं नियोजन भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांची विजयी मिरवणूक काढली जाणार संध्याकाळी ५ वाजता बोरिवली विधानसभा निवडणूक कार्यालयातून मिरवणूक काढण्याचे नियोजन.मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली..महाराष्ट्र विधानसभेवर नक्की कोणाचा झेंडा फडणार? महायुतीचा की महाविकास आघाडीचा हे आज स्पष्ट होणार आहे. 23 नोव्हेंबर सकाळी आठ वाजल्यापासून निवडणुकीचा निकाल लागायला सुरुवात होणार आहे. यातच मुंबईकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागलंय मुंबईमध्ये सरासरी 50% मतदान झालं आहे. अशावेळी मुंबईकर नक्की कोणाला आपला कौल देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कौल मिळाला. यानंतर शिवसेनेने आपली चूल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मांडली, महाविकास आघाडी सत्तेत आली. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं ते भाजप सोबत गेले महायुतीने महाराष्ट्रात सरकार बनवलं. पुढे या सरकारमध्ये अजित पवारही सामील झाले. आता मुंबईमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती थेट लढत पाहायला मिळत आहे. यातच राज ठाकरे यांचा मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मुंबईमध्ये कशाप्रकारे आपला इम्पॅक्ट पडतो हे पहाणही अतिशय उत्सुकतेच असणार आहे. मतदानानंतर विविध एक्झिट पोल महाराष्ट्रा समोर आले आहेत यामध्ये बहुसंख्य एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजूने आहेत. यामुळे मुंबईकर नक्की कोणाला साथ देतो हे पाहणं अतिशय असणार आहे. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.