ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवतींना आधार; अत्यावश्यक वेळी 'ही' कॅब तुम्हाला देणार सेवा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या अलाईट कॅब सेवेचा लाभ 150 ते 200 प्रवाशांनी घेतला आहे. या सेवेसाठी पाच कॅब आहेत, त्यासाठी रोज 200 ते 250 व्यक्तींनी मागणी नोंदवली.

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती आदींना बिगरवैद्यकीय तातडीच्या कारणांसाठी महिंद्र लॉजिस्टिक्सतर्फे अलाईट (ALYTE) कॅब सेवा सुरू झाली आहे. ही कॅब सेवा मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई येथेही उपलब्ध असेल. 

नक्की वाचा : कोरोनावरील लस 'फास्टट्रॅक'मध्ये बनवा ! कोरोना लस निर्मितीत भारताची मजल कुठवर?

मुंबईच्या पश्चिम उपनगरांत १४ एप्रिलपासून सुरू झालेल्या अलाईट कॅब सेवेचा लाभ 150 ते 200 प्रवाशांनी घेतला आहे. या सेवेसाठी पाच कॅब आहेत, त्यासाठी रोज 200 ते 250 व्यक्तींनी मागणी नोंदवली. तथापि, ही सेवा केवळ ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गर्भवती अशा विशिष्ट व्यक्तींना तातडीच्या कामासाठीच असल्याने निवडक लोकांनाच लाभ देण्यात आला. आणीबाणीच्या प्रसंगांसाठी नोंदवलेल्या मागणीसंदर्भात संबंधितांचा पोलिसांशी संपर्क साधून देण्यात आला. मोठ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगांत पोलिसांच्या सहकार्याने अपवाद करण्यात आले, असे महिंद्र लॉजिस्टिक्सचे विभू मन्या यांनी सांगितले.

मोठी बातमी : लवकरच येऊ शकते गोड बातमी ! १०० युनिटपर्यंत वीज मोफत? मंत्री नितीन राऊत यांचं मोठं वक्तव्य..

या कॅब सेवेसाठी मुंबईच्या अन्य भागांतूनही मागणी होत असून, प्रशासन व पोलिसांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. लवकरच ठाणे आणि वाशी येथेही अलाईट कॅब सेवा देण्याचा महिंद्र लॉजिस्टिक्सचा विचार आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती आदींना बँक, टपाल कार्यालय, रुग्णालयांत जाण्यासाठी किंवा औषधे, अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी ही सेवा दिली जाते. डॉक्टर, परिचारिका आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाही या कॅब मिळू शकतात.

 

Mumbai, Thane, Navi Mumbai Now Elite Cab service


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai, Thane, Navi Mumbai Now Elite Cab service