
'ऐसी अक्षरे रसिके' पुस्तकाचे प्रकाशन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचा हस्ते
ठाणे : वाचकांच्या मनात मूळ पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण करणारे आणि पुस्तक का वाचावे याची नवदृष्टी देणारे असे 'ऐसी अक्षरे रसिके' हे पुस्तक अनेक नवीन जुन्या पुस्तकांचा परीक्षण संग्रह आहे. नवनवीन तसेच जुन्या गाजलेल्या पुस्तकांच्या शोधात असलेल्या वाचकांना अशा वाचनीय पुस्तकांची ओळख करून देणारे असे ' ऐसी अक्षरे रसिके ' हे पुस्तक आहे असे प्रतिपादन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केले.
शॉपिझेन प्रकाशन तर्फे प्रकाशित लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या' ऐसी अक्षरे रसिके ' या पुस्तक परीक्षण संग्रहाचे प्रकाशन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की ," कोणत्याही शहराची उंची ही तेथील इमारतीच्या उंचीवरून नाही तर तेथील वाचनालये, ग्रंथालये, अभ्यासिका आणि तेथे असणारी असंख्य पुस्तके आणि वाचकांची गर्दी यावरून ठरत असते. शहराची वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक श्रीमंतीत वाढ करण्याचे योगदान हे प्रत्येक पुस्तक, ग्रंथच करत असतात. उत्तम वाचन संस्कारांचा उपयोग प्रत्येक कार्य क्षेत्रात तुम्हाला होत असतो. समाज माध्यमात रुळणाऱ्या नवीन पिढीतही वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मूळ पुस्तकांचा सखोल आणि सर्वांगीण परिचय करून देणाऱ्या ' ऐसी अक्षरे रसिके ' अशा माहितीपूर्ण पुस्तकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
हेही वाचा: डोंबिवली : अमेरिकन डॉलरच्या नावाखाली कोरे कागद देणाऱ्या गुन्हेगारांना अटक
"लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या लेखनशैलीमुळे या पुस्तकांचा समीक्षणात्मक परिचय होतो,वाचकांची उत्सुकता वाढत राहते ,असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर विजया वाड, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, राशीचक्रकार श्री शरद उपाध्ये, संपदा जोगळेकर कुलकर्णी इत्यादी अनेक नामवंत दिग्गजांच्या पुस्तकांवर लेखिका प्रज्ञा पंडित यांनी समीक्षणात्मक परीक्षण या पुस्तकात केले आहे.
Web Title: Mumbai The Book Aisi Akshare Rasike Was Published By Thane Mayor Naresh Mhaske
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..