Mumbai: फेरीवाल्यांनी केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण!

Mira Bhaindar: पोलिसांनी सतरा फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
Crime
Crimesakal

Mumbai: व्यवसाय करण्यास मनाई केल्याच्या रागातून मिरा रोड येथील फेरीवाल्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात १७ फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे.

Crime
Mumbai Local: रविवारी मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक! कुठे, कधी, कसा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शांतीनगर परिसरात काही दिवसांपासून फेरीवाल्यांसंदर्भात वाद सुरू आहे. एका दुकानदाराला फेरीवाल्याकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर महापालिकेकडून सातत्याने तेथे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. फेरीवाल्यांच्या आझाद हॉकर्स संघटना व महापालिका प्रशासन यांच्यात त्यावरून वाद सुरू आहे. गुरुवारीही पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने फेरीवाल्यांना तेथे व्यवसाय करण्यास मनई केली. त्यानंतरही फेरीवाल्यांनी तेथे आपला माल विकण्यास सुरुवात केली. त्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत हे अन्य कर्मचाऱ्यांसह तेथे कारवाई करण्यासाठी पोहोचले.

Crime
Jalgaon Crime News : वन विभागाच्या कारवाईत 90 हजारांचे लाकूड जप्त; अंधाराचा फायदा घेत चालक वाहन सोडून पसार

त्या वेळी नयानगर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारीही त्यांच्यासोबत होते. यावेळी काही फेरीवाल्यांनी चव्हाण आणि सावंत यांना मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी चव्हाण यांनी नयानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सतरा फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Sambhaji Nagar Crime : गांधीनगरातील गांजावरून राडा ; परस्परांविरोधात तक्रार, आठ आरोपी ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com