मुंबई : राज्य सरकार नेमणार विशेष समिती

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न; आंदोलन सुरूच
ST
STesakal

मुंबई : विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकार विशेष समिती नेमणार आहे. या समितीची रूपरेषा सोमवारी (ता. ८) सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. कर्मचारी संघटनांनी तूर्तास संप मागे न घेण्याची भूमिका कायम ठेवली.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आज राज्यातील ७२ आगार बंद होते. त्यामुळे आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संप सुरूच राहणार आहे. कर्मचारी आणि महामंडळ यांच्यात चर्चा करण्यासाठी आणि संपावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील सचिवांची समिती नियुक्त करण्याची तयारी राज्य सरकारकडून दर्शविण्यात आली.

ST
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार : रामदास आठवले

सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष

समितीबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेण्यास संघटनेकडून असमर्थता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सोमवारी सकाळी होणाऱ्या पुढील सुनावणीनंतरच यावर संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात येईल असे संघटनेच्या वतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. राज्य सरकारच्या ढिसाळ भूमिकेमुळे आतापर्यंत ३५ कामगारांनी आत्महत्या केली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने याची दखल घेतली. तसेच सोमवारी महाधिवक्त्यांनी भूमिका मांडावी, असे निर्देश दिले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यातील काही आगारांमध्ये काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com