मुंबई : शेअरबाजारात पडझड सुरूच

सेन्सेक्स १०१ अंश, तर निफ्टी ६३ अंशांनी गडगडला
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : नफावसुलीमुळे भारतीय शेअरबाजार निर्देशांक आज सलग चौथ्या दिवशीही घसरले. सेन्सेक्स १०१.८८ अंश, तर निफ्टी ६३.२० अंश घसरला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०,८२१.६२ अंशांवर, तर निफ्टी १८,११४.९० अंशांवर स्थिरावला.

आजही बँकांचे शेअर वाढ दाखवत बंद झाले, तर आयटी, धातू उद्योग, औषधनिर्मिती, वाहनउद्योग यांचे शेअर घसरले. सकाळी भारतीय बाजार चांगलेच वर होते, सेन्सेक्सही ६१,४२० पर्यंत गेला होता. मात्र, नंतर नफावसुली सुरू झाल्यावर बाजार घट दाखवीत बंद झाले. चीनच्या एव्हरग्रँड कंपनीने कसाबसा तग धरल्याच्या वृत्ताबरोबरच चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने तेथे निर्बंध लादले जात असल्याच्या बातमीने अस्वस्थता वाढली. त्यातच अमेरिकेतून प्रतिकूल बातम्या आल्याने भारतीय शेअरबाजारात नफावसुली झाली.

Mumbai
सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारांत नफावसुली, निफ्टी पंधरा हजारांखाली, सेन्सेक्स 397 अंशांनी घसरला

आयटीसी (बंद भाव २३६ रु.), मारुती (७,४११), इन्फोसीस (१,७१९), एचसीएल टेक (१,१९४), टाटा स्टील (१,२९५), महिंद्र आणि महिंद्र (८८५), नेस्ले (१९,००९), टीसीएस (३,५००), लार्सन अॅण्ड टुब्रो (१,७९१), डॉ. रेड्डीज लॅब (४,६३६) यांचे भाव घसरले; तर दुसरीकडे एचडीएफसी ५९ रुपयांनी वाढून २,९०२ रुपयांवर गेला. कोटक बँक (२,१७१), ॲक्सिस बँक (८१६), आयसीआयसीआय (७५९), इंडसइंड बँक (१,१९५), एचडीएफसी बँक (१,६८१), बजाज फिनसर्व्ह (१८,६६४) यांचे भाव वाढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com