
विविध महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासह राज्यभरातील प्रवास महागणार आहे. राज्य सरकारने परिवहन विभागाचा आढावा घेऊन रिक्षा, टॅक्सी, एसटी तसेच विविध शहरांतील बस तिकीटदरांत १५ टक्क्यांपर्यंत वाढीचे संकेत दिले आहेत.
यानुसार रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन ते चार रुपये, तर बसचे तिकीटदर एक ते पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. १५) होणाऱ्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता आहे.