esakal | मुंबई: ठाण्यात नारळाचे झाड पडून तिघे जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Coconut Tree

मुंबई: ठाण्यात नारळाचे झाड पडून तिघे जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : वर्तकनगर येथे बुधवारी रात्री नारळाचे झाड घरावर पडून तिघे जण जखमी झाले आहेत. तिघांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना खासगी क्लिनिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक १, विजय नगरीमधील प्यारेलाल यादव चाळीतील रूम नंबर ६ वर बुधवारी रात्री पडले.

यामध्ये विनोद रामधनी जैस्वाल (४४) आणि पूजा रविदास जैस्वाल (२२) व आदित्य हिरेंद्र चव्हाण (९) हे तिघे जखमी झाले असून, विनोद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, चार टाके पडले आहेत. तर दोघांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेत रामधणी जैस्वाल यांच्या मालकीच्या घराच्या छताचे नुकसान झाले असून झाड हटविण्याची कारवाई तातडीने हाती घेण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

loading image
go to top