Mumbai to Vijaydurg Ro Ro Ferry to Start from March 1

Mumbai to Vijaydurg Ro Ro Ferry to Start from March 1

Esakal

शिमग्याला मुंबईहून तळकोकणात फक्त ७ तासात, मार्च महिन्यात १६ रो-रो फेऱ्या; वेळ वाचवणारा आणि आरामदायी प्रवास

Ro Ro Ferry Between Mumbai and Vijaydurg मुंबई ते विजयदूर्ग अशी रो-रो फेरी १ मार्चपासून सुरू होणार आहे. एकूण १६ फेऱ्या नियोजित असल्याची माहिती समोर आलीय. या रोरो सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास आरामदायी होणार आहे.
Published on

शिमग्यानिमित्त तळकोकणात जाणाऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. फक्त सात तासात समुद्रमार्गे मुंबईतून तळकोकणात पोहोचता येणार आहे. मुंबई ते विजयदूर्ग अशी रो-रो फेरी १ मार्चपासून सुरू होणार आहे. एकूण १६ फेऱ्या नियोजित असल्याची माहिती समोर आलीय. या सेवेचं उद्घाटन १ मार्च रोजी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास स्वत: नितेश राणे करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com