traffic diversion
sakal
मुंबई : छठपूजेनिमित्त जुहू समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. रविवारी (ता. १५) दुपारी दोन वाजल्यापासून सोमवार (ता. १६) सकाळी ११ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या काळात काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, काही मार्गावर एकेरी वाहतूक आणि पार्किंगबंदी लागू करण्यात आली आहे. सांताक्रूझ वाहतूक विभागाच्या हद्दीत हे बदल करण्यात आले आहेत.