

Mumbai Traffic Route Change for Mahaparinirvan Din
ESakal
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अनुयायी ४ डिसेंबरपासून चैत्यभूमी, दादर परिसरात येणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे चैत्यभूमी व आसपासच्या परिसरातील रस्त्यांच्या वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता शुक्रवार (ता. ५) ते रविवारपर्यंत (ता. ७) वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत चैत्यभूमी, शिवाजी पार्क दादर परिसरातील वाहतुकीवर गर्दीमुळे परिणाम होणार आहे.