

Mumbai Traffic
ESakal
मुंबई : गणेशोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केल्यानंतर उद्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. शुक्रवार (ता. २५) रोजी अनंत चतुर्थी निमित्त सर्व गणरायांचे विसर्जन केले जाणार असून बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. मुंबईतील गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीसह परिसरात लाखोंची गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता प्रशासनाने मुंबईत वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.