
मुंबई: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शुक्रवारी (२२ ऑगस्ट) पहाटे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुशीनगर एक्सप्रेसच्या (गाडी क्रमांक २२५३७) एसी कोच B2 च्या बाथरूममधील कचऱ्याच्या डब्यात एका तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.