

मुंबई : महाराष्ट्रात ई-चालान प्रणालीविरोधात ट्रान्सपोर्टर्स आक्रमक झाले असून ट्रक, बस आणि इतर व्यावसायिक वाहनमालकांनी आर-पारची लढाई जाहीर केली आहे. ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी’च्या नेतृत्वाखाली ५ आणि ६ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात ट्रक, टेम्पो, बस, ऑटो आणि ट्रॉलीसह सुमारे दोन लाखांहून अधिक चालक आणि वाहनमालक सहभागी होण्याची शक्यता आहे.