esakal | मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी जैन मंदिरांचे दरवाजे खुले

बोलून बातमी शोधा

Covid centres
मुंबईतील दोन जैन मंदिरं आजपासून 'कोविड केअर सेंटर'
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसत आहे. प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी पालिकेकडून कोविड सेंटर उभारण्यात येताहेत. त्यातच आता मुंबईतील दोन जैन मंदिरांमध्ये कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे. मंदिरातील प्रार्थना करण्याचं साहित्य तसंच जैन तत्वज्ञानावरील पुस्तके सर्व कपाटात ठेवण्यात आली आहेत. दानपेटी एका कोपऱ्यात ठेवली आहे. तर पूजा करण्याच्या खोलीत एक्स-रे मशीन ठेवलं आहे. मंदिरात आता बेड्स लावून ऑक्सिजन सिलेंडर मागवण्यात आलं आहे.

पवन धाम, हे कांदिवलीतील पश्चिम भागात असून येथे जैन धर्मीय लोकं प्रार्थना करण्यासाठी गर्दी करत असतात. आजपासून येथे कोरोना रुग्णांसाठी या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. या मंदिरात कोविड सेंटर तयार केलं आहे. या सेंटरमध्ये वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय हे देखील उपलब्ध आहेत. या सेंटरमध्ये आयसीयूची सुविधा नाही आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना बेडची तसंच ज्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे, अशांना येथे दाखल केलं जात आहे. येथे लाइफ-सेव्हिंग मशीन, पोर्टेबल एक्स-रे, ऑक्सिजन कॉन्सेन्टर्स आणि डिफिब्रिलेटरची सुविधा आहे.

हेही वाचा: ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला कमी पाडला जातोय? - संजय राऊत

बोरिवली येथील स्थानिक रूग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय अशी ५० जणांची टीम येथे उपलब्ध आहे. कांदिवलीत एकूण १०० बेड्स, घाटकोपर मंदिरात ६० अशी सुविधा करण्यात आली आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी होणार चौकशी

स्वयंसेवक प्रदीप मेहता म्हणाले यांनी सांगितलं की, मंदिरातील सर्व साहित्य बांधून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. सर्व मंदिराची ५० हजार चौरस फूट जागाही कोविड सेंटरसाठी उपयुक्त ठरेल. येथे सकाळीच्या ब्रेकफास्टसह नियमितपणे कुटुंबियांना आरोग्याविषयी माहिती देणं. तसंच रोजचा वैद्यकीय रिपोर्ट पाठवणं या सर्व गोष्टींची येथे काळजी घेतली जाईल.

mumbai two jain temples turn into covid care centres kandivli ghatkopar