esakal | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी होणार चौकशी

बोलून बातमी शोधा

Param Bir singh
परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी होणार चौकशी
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आणखी एका प्रकरणात परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस अधिकरी अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचार आणि अंडरवल्डशी संबंध असल्याचे आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. आदेशानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस महासंचालक संजय पांडे करणार आहेत. त्यामुळे संजय पांडे हे परमबीर सिंह यांची चौकशी करतील.

परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे अनुप डांगे हे गावदेवी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. डांगे यांनी त्यांच्या तक्रारीत, कशा प्रकारे परमबीर यांनी पदाचा गैरवापर केला. त्यांचे अंडरवल्डशी कसे संबध आहे, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. डांगे यांनी दिलेल्या पत्राची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा: Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

दरम्यान आता या प्रकरणाची चौकशी सध्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे हे करत आहेत. परमबीर सिंह यांची चौकशी करावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी पांडे यांच्या जवळ परमबीर यांनी अनिल देशमुख हे १०० कोटी वसूली करण्यास सांगत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.

हेही वाचा: Corona Virus: मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार

या प्रकरणी परमबीर यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवलं. त्यानंतर या प्रकरणात परमबीर सिंह, सचिन वाझे, अनिल देशमुख त्यांचे दोन स्विस सहाय्यक, पोलिस दलातील एक डीसीपी, आणि एसीपीसह अन्य काही जणांचे जबाब ही नोंदवले होते. आता परमबीर सिंह यांचे हे दुसरं प्रकरण समोर आले आहे.

parambir singh will be questioned by director general of police sanjay pandey