
Latest Mumbai News: शहरात दोन तरुणांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. वरळी आणि भांडुप येथे गुरुवारी (ता. २३) या दोन स्वतंत्र घटना घडल्या. यातील एक तरुण पोलिस पुत्र तर दुसरा राजकीय कार्यकर्त्याचा मुलगा आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष सुरक्षा विभागात (एसपीयू) नियुक्त अंमलदार संतोष मस्के वरळी येथील सेंच्युरी म्हाडा वसाहतीत कुटुंबासह राहतात. ते गुरुवारी काही कामानिमित्त गावी गेले होते; त्यांचे शासकीय अग्निशस्त्र (पिस्टल) घरीच होते. त्यांचा मुलगा हर्ष याने दुपारी १२च्या सुमारास ते शस्त्र घेत स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले आणि मस्तकात गोळी झाडून घेतली.