
Mumbai : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला कल्याणात मोठा धक्का…
कल्याण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील कल्याण उपजिल्हाप्रमुख ,जुने जाणते शिवसेना पदाधिकारी,माजी नगरसेवक, मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व अरविंद मोरे यांनी आपल्या अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली अरविंद मोरे यांच्या सोबतच माजी शिक्षण मंडळ सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष. डॉ जितेंद्र भामरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस राजीव कपोते युवा सेनेचे विष्णू लोहकरे दिनेश निचीत,सुजय कदम या सर्वांना भगवा झेंडा हाती देऊन एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश दिला.
या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे कल्याण मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे अरविंद मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मधील शिवसेना अधिक बळकट करण्याचे संकेत दिले
या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील ,जयवंत भोईर,श्रेयस समेळ,छायाताई वाघमारे , संजय पाटील नेत्राताई उगले, मयूर पाटील, गोरख जाधव अंकुश जोगदंड, अभिषेक मोरे आणि इतर नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.