अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; वाचा सविस्तर

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; वाचा सविस्तर


मुंबई : अंतिम वर्ष परीक्षेबाबत मुंबई विद्यापीठाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांकडे उपलब्ध गॅजेट्सच्या माध्यमातूनच परीक्षा घेता येऊ शकतील, अशी व्यवस्था करण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे. विद्यार्थ्यांकडे परीक्षेसाठी साधन उपलब्ध नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी यंत्रणांची मदत घेता येईल, अशी सूचना विद्यापीठाने मार्गदर्शक सूचनांमध्ये केली आहे. 

विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब, डेस्कटॉप इंटरनेट जोडणी आदी उपलब्ध आहे की नाही, याची माहिती जमा करण्यास सांगितली आहे. विद्यार्थ्यांकडे साहित्य नसल्यास त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यावेत. तेही शक्य होत नसतील, तर अशा विद्यार्थ्यांची नावे प्रमुख महाविद्यालयांना कळवावीत, जेणेकरून ही महाविद्यालये स्थानिक सरकारी यंत्रणांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना सहकार्य करू शकतील, असे विद्यापीठाने सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे. याचबरोबर ऑनलाइन परीक्षेसाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे ते सुरक्षित असावे. तसेच त्याच्यासाठी तांत्रिक सहकार्य उपलब्धही करून द्यावेत, असेही म्हटले आहे. 

परीक्षेबाबत महाविद्यालयांना सूचना

  • - विद्यार्थ्यांना परीक्षा मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप यावरून देता यावी. 
  • - सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना वापराच्या दृष्टीने सुलभ असावे. 
  • - इंटरनेटचे कमीत कमी बॅण्डविड्थ लागेल असे सॉफ्टवेअर असावे. 
  • - नेटवर्क गेले तर विद्यार्थी आहे तिथेच येईल, अशी सुविधा असावी. 
  • - प्राध्यापकांसाठी प्रश्नसंच अपलोड करून ठेवावा. 
  • - गुगल फॉर्मसारख्या सुरक्षित पर्यायाचा वापर करावा. 
  • - परीक्षा सुरू व्हायची वेळ आणि संपायची वेळ असावी. त्या कालावधीत परीक्षा सुरू व्हावी व बंद व्हावी. 
  • - विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पडेस्क असावा. 
  • - महाविद्यालय ज्या प्रणालीने परीक्षा घेणार आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना तपशीलवार माहिती उपलब्ध करून द्यावी. 
  • - याबाबतचे माहिती पुस्तक किंवा व्हिडीओ तयार करून ते विद्यार्थी तसेच प्राध्यापकांपर्यंत पोहोचवावे. यामुळे तांत्रिक अडचणी कमी येऊ शकतील.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com