मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हळदी-कुंकू न झाल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - शैक्षणिक कार्यक्रमांचा दर्जा राखणाऱ्या मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हळदी-कुंकू आणि सत्यनारायण पूजेसारखे धार्मिक कार्यक्रम होत असल्याचे उघड झाल्यानंतर विद्यापीठाने आता सारवासारव करण्यास सुरवात केली आहे.

हळदी-कुंकूसारखे कार्यक्रम विद्यापीठ अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातच केले. या कर्मचाऱ्यांच्या खानपानाचा कार्यक्रम दीक्षांत सभारंभाजवळच्या कक्षात झाला, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी दिली. दीक्षांत सभागृहात सत्यनारायण पूजा झाल्याची नोंदही विद्यापीठाकडे नाही, असे ते म्हणाले.

दीक्षांत सभागृहाला एक आगळावेगळा दर्जा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांसाठी शुल्क घेतले जात नाही. इतर कार्यक्रमांसाठी तासागणिक आणि सुविधांप्रमाणे दर आकारला जातो. हा दर कार्यक्रमाच्या तासाप्रमाणेही आकारला जातो, त्यामुळे प्रत्येक दरआकारणीत फरक असतो, असे ते म्हणाले.

Web Title: mumbai university dikshant sabhagrah